दीवार : बिल्ला क्रमांक ७८६ मार्गे हिंदूंचे खच्चीकरण

शिव हा एक शिक्षा देणारा देव आहे जो कधीही निरुपा रॉय यांच्या आजीवन प्रार्थना ऐकत नाही तर ७८६/ अल्लाह एक संरक्षण करणारा देव आहे
दीवार : बिल्ला क्रमांक ७८६ मार्गे हिंदूंचे खच्चीकरण
Published on
6 min read

या मालिकेत

Also Read
दीवार : सिनेसृष्टीत उत्कृष्ट पाठ्यपुस्तक नेहरूवादी धर्मनिरपेक्षता व साम्यवादाचा सर्वात वाईट पैलू दाखवणारा: प्रस्तावना
Also Read
दीवार - नेहरूप्रणीत साम्यवाद यांच्या सर्वात वाईट भागाचा उदोउदो करणारे अभिजात चित्रपटविषयक पाठ्यपुस्तक -- भाग २

ज्यांना भारतातील धर्मनिरपेक्षतेचे आजोबा असे म्हटलेले जवाहरलाल नेहरू सुद्धा पुष्कळ मौखिक आणि शाब्दिक बडबड करूनही त्यांच्यात एवढी बुद्धी नव्हती सलीम-जावेद इतकी ज्यांनी बारकाव्याने ,कपटीने इस्लामवादाचे प्रसारण केले मुख्य प्रवाहातील चित्रपटात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आणि हिंदू-मुस्लीम भाऊ- भाऊ साचा तयार केला .दीवार हा त्यांचा उच्च बिंदू होता . ते पुढे दीवार सारखे किंवा त्याहूनही सरस प्रतिकृती करू शकले नाही.

हा विलक्षण विक्रम शब्दशः एका बिल्यावर अवलंबून आहे. तोच बिल्ला क्रमांक ७८६ दीवारच्या नंतर जवळजवळ दोन दशक सर्वव्यापी उपस्थित होता. नुसत्या हिंदी चित्रपट क्षेत्रा मध्येच नाही तर तेलुगु भाषेतले चिरंजीवी यांचे न समजणारे चित्रपट जसे कैदी क्रमांक ७८६. आणखीन एक भव्य चित्रपट मिथुन चक्रवर्ती यांचे देखील आहे ज्याच्यात विचारांना बंधन न घालता बिल्ला क्रमांक ७८६ नाव दिले.

आणि जर आपण विचार केला त्या हास्यास्पद, मनाला न पटणाऱ्या "कर्णधार विजयकांत" चित्रपटातल्या दृश्याचे जिथे गोळी विजयकांतच्या छातीला लागून उडून जाते कारण त्याच्या निळ्या रंगाच्या शर्टाच्या आत मध्ये धातूचे कवच छाती भवती घातले होते. तो आदर्श भारतीय चित्रपटातील अग्रणी क्षण होता कारण अमिताभ बच्चन हे असेच १९७५ साली सदरक्रम नोंदवला होता. त्याच्या सारखा दीवार चित्रपटात अमिताभ बच्चन हे कायमस्वरूपी संतप्त व निराश डॉकयार्ड कामगार-वर्गाचा कामगार आहे ज्यात त्यांचा छळ होतो लोभी, श्रीमंत लोकाच्या हातून . म्हणून त्याला धातूचे कवच परवडू शकले नाही. परंतु चित्रपटाचा कथानक बघितले तर धातूची छाती पूर्णपणे अनावश्यक बनते कारण त्याने आपल्या छातीच्या खिशात बिल्ला क्रमांक ७८६ ठेवला आहे ज्याच्यामुळे तो गोळीपासून वाचतो दोन वेगळ्या प्रसंगी.

हे कदाचित आज एखाद्याला मजेशीर आणि हास्यास्पद वाटेल परंतु आपण जर त्या काळात जगला असाल तर चित्रपटाच्या जबरदस्त यशाचे योगदान देणारे हे ठळक दृश्य आहे. त्यांनी त्यावेळी खरोखरच प्रेक्षकांचे मने जिंकली होती कारण हे इतक्या कुशलतेने आणि भावनिक कृतीने आकर्षक केले गेले होते.

आपण फार पुढचे बोलत आहे.

अगणित वेळा जुना विक्रम पुन्हा बजावण्यासाठी दीवारच्या धर्मनिरपेक्षतेचे आधार म्हणजे इस्लामवादांना शांततापूर्ण परोपकारी व संरक्षण करणारा धर्म आहे मुसलमान गरीब कष्टकरी प्रामाणिक अल्लाला घाबरणारे लोक आहेत आणि समतोल ठेवण्यासाठी हिंदू धर्माबद्दल पुरेशी सकारात्मक सामग्री दाखवणे. तो काळ असा नव्हता की हिंदू परंपरा, संस्कृती, चिन्हे, चालीरिती आणि देवतांना खुलेपणे तडाखा देत चित्रपट बनवू शकत, जसे की आताचे हैदर, रमण राघव, पीके, लीला आणि संपूर्ण अशा प्रकारच्या कचऱ्याचा ढीग. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाले तर, इस्लाम हा शांततेचा धर्म आहे आणि हिंदूंना त्यांच्या सनातन धर्माची अजाणीवपूर्वक लाज वाटली पाहिजे असे मृगजळ प्रचाराला बळी पाडणे पुरेश्या प्रमाणात हिंदूंना मवाळ करू शकले नाही.

Read this series in English

Also Read
Deewaar: The Classic Cinematic Textbook Celebrating the Worst of Nehruvian Secularism and Communism: Part 1
Also Read
Deewaar: The Classic Cinematic Textbook Celebrating the Worst of Nehruvian Secularism and Communism: Part 2
Also Read
Deewaar: Disarming Hindus via Billa No. 786

अमिताभ बच्चन यांनी हमालाचा बिल्ला क्रमांक ७८६ घातलेला पहिला दृष्य कुठे चित्रांकित केला गेला आहे आठवतोय का? शिव मंदिरासमोर जेथे त्याची आई निरुपा रॉय रोज जाते. बरं बिल्ला क्रमांक ७८६ वर काही काळ कॅमेरा रेंगाळतो.

पुढच्या दृश्यात त्याचे संपूर्ण महत्त्व सांगितले आहे परोपकारी आणि वृद्ध रहीम चाचा यांनी जो गरीब, कष्टकरी, मदतशील आणि धार्मिक मुसलमानाचा नमूना आहे. क्रमांक ७८६ मुळे सढळहस्तेमिळणाऱ्या व संरक्षणाबद्दलचे संवाद थेट मशिदीतील दयाळू मौलवींनी दिलेल्या काही धर्मोपदेशसारखेआहेत , बिल्ला क्रमांक ७८६ सकाळच्या उन्हात तेजस्वीपणे चमकत दृश्य पूर्ण केले.

७८६… हम लोगों में इसे बहुत मुबारक समझते हैं. जैसे होता है ना वो ओम ? वैसे यह ७८६… ७८६ का मतलाब होता है बेटा, बिस्मिल्लाह. शुरु करता हूं अल्लाह के नाम से. बहोत मुबारक चीज़ है बेटा. बड़ी बरकत है इस बिल्ले में, इज बिल्ले को हमशा अपना पास रखना.

साधारण अनुवादः आमच्या समाजात, ७८६ हे खूप शुभ मानले जाते. 786 हे ओम सारखेच आहे. माझ्या मुला, ७८६ चा अर्थ बिस्मिल्लाह आहे. हे असे म्हणण्यासारखे आहे की, “मी अल्लाहच्या नावाने सुरूवात करतो.” मुला, ही खूप मंगल गोष्ट आहे. त्याच्यात भरपूर भरभराटी आहे. हा बिल्लानेहमी आपल्याकडे ठेव.

Also Read
Revisiting the Radio Station in Rang De Basanti: A Case Study in Bollywood Communist Propaganda

हे खरोखर अनुकरणीय पटकथा-लेखन आहे. तिथेच. एका मिनिटापेक्षा कमी वेळेच्या आत, सलीम-जावेद जोडीने हिंदूंना शब्दाने गाफील केले हिंदूंना नरम करण्यासाठी कल्पकतेने काम केले, इस्लामसह जगण्याचा ऐतिहासिक अनुभव माहित असूनही, मूळ इस्लामिक सिद्धांताची वास्तविकता लपवून . दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर ते म्हणजे सिनेमाच्या माध्यमातून हिंदूंचा हलाल करणे. या प्रकरणात, ओम बरोबर बिस्मिल्लाह समान आहे ही युक्ती विशेषत:. या मुद्द्यावर विस्तृतपणे वर्णन करणे या निबंधाच्या कक्षेच्या पलीकडे आहे.

गतकालीन गोष्टींचे अवलोकन केल्यावर दीवारच्या अतुलनीय यशानंतर असे दिसते की तेव्हापासून बनलेल्या प्रत्येक चित्रपटात रहिम चाचा सारखा पात्र अनिवार्य असायला हवा. अत्यंत त्रासदायक ए.के. हंगल, शोले येथील गावातला मौलवी अल्लाह आणि पैगंबराचे (अल्लाची मर्जी त्याच्यावर नेहमी राहो ) प्रशंसा करणारे . मुकद्दर का सिकंदर चित्रपटात धार्मिक फकीर, लावारीस चित्रपटात त्या समान फकीर… मग तिथे एक गरीब मुस्लिम कसाईचे पात्र आहे जे सुरेश ओबेरॉय याने रंगवले आहे आणि एक मुस्लिम पोलिस पात्र जो खुदा व रसूलच्या महानतेबद्दल धार्मिक गोष्टी बोलतो शराबी चित्रपटात … मग अपकर्षणाचा फिरोज खान आहे. ज्यांच्या चित्रपटांमध्ये इस्लामच्या वैभवाचे गुणगान करणारे किमान एक गाणे किंवा दृश्य दर्शविला गेली आहे ... यादी जवळजवळ अंतहीन आहे.

दीवारमधील कपटी धर्मनिरपेक्षतावादी संपूर्ण सरमिसळ तुलना केल्याशिवाय समजू शकत नाही. या चित्रपटातील निरंतर सहनशील पण प्रेमळ आणि काळजी घेणारी आई निरुपा रॉय यांचे उदाहरण घ्या. ती प्रत्येक पाऊलात एक अत्यंत श्रद्धाळू हिंदू आई आहे जी नेहमीच शिव मंदिरात जाते आणि त्याच्याबद्दल तिची भक्ती अटूट आहे. तरीही तिची भक्ती शेवटी तिला काय मिळवून देते ? एक गुन्हेगार मुलगा आणि एक पोलिस अधिकारी मुलगा जे एकमेकांविरूद्ध युद्ध पुकारतात ज्याच्या शेवट पहिल्या मुलाचा मृत्यूने होतो .

पोलिस बंधू शशि कपूर याचा शिवावरील विश्वास आणि श्रद्धा ही मुख्यत्वे संदिग्ध आणि अस्पष्ट आहे परंतु अमिताभ बच्चन आपल्या आईच्या आवडत्या देवताबद्दल सतत रागावलेला असतो कारण शिवाने या धार्मिक व दयाळू स्त्रीवर खूप अत्याचार केला आहे. दीवारच्या सुरूवातीच्या काळातल्या एका अतिशय भावूक दृश्यात, मंदिराचा पुजारी निरुपा रॉय हिला सांगतो की ज्या दिवशी अमिताभ बच्चन आपल्यात श्रद्धाचा निर्माण करतील (थोडक्यात विश्वास किंवा दृढनिश्चयाने) तो मंदिरात आपोआप येईल. तरीही तोच अमिताभ बच्चन ७८६ च्या दिशेने पटकन श्रद्धा विकसित करतो जेव्हा रहीम चाचा त्याला त्याची दैवीशक्ती सांगतो .

खरंच, अमिताभ बच्चन यांनी त्याच मंदिरामध्ये शिवाशी अखेरपर्यंत वाढवलेले संभाषण म्हणजे संवाद आणि दृश्याच्या चित्रीकरणाचा एक चमकदार नमूना आहे.

ही अपवादात्मक करामत देखील आहे मानसशास्त्रासंबंधीचा संग्रामाचा.

विचारण्याचा प्रश्न असा आहे की: अमिताभ बच्चन शेवटी श्रद्धा विकसित केल्यामुळे शिव मंदिरात जातो का? हे स्पष्ट आहे की तसे नाही. तो तेथे गेला कारण त्याला त्याच्या प्रयत्नाने आणि प्रार्थनेने आजारी आईला मरण्यापासून वाचवायचे होते . म्हणून जेव्हा अमिताभ बच्चन यांचे पात्र शिव यांना “माझ्या पापांसाठी माझ्या आईला शिक्षा करु नका” अशी विनवणी करतो आणि आम्ही ही गोष्ट संपूर्ण चित्रपटाच्या संदर्भात ठेवतो तेव्हा त्याचा परिणाम वैचारिक हाथोड्या सारखा होतो. शिव हा एक शिक्षा देणारा देव आहे जो कधीही निरुपा रॉय यांच्या आजीवन प्रार्थना ऐकत नाही तर ७८६/ अल्लाह एक संरक्षण करणारा देव आहे. आम्ही आधी पाहिल्याप्रमाणे, फक्त बिल्ला क्रमांक ७८६ आहे ज्याने अमिताभ बच्चन यांना वारंवार मृत्यूपासून वाचवले. जेव्हा तो बिल्ला क्रमांक ७८६ हरवतो तेव्हाच त्याच्यावर प्राणघातक गोळ्या घातल्या जातात आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. दुसर्‍या शब्दांत, तो अल्लाहचे संरक्षण गमावतो. आणि तो कुठे मरणार? बरोबर त्याच शिव मंदिरात.

हे असे करायचे असते . सलीम-जावेद यांचे प्रामाणिक कौतुक .

आता, हिंदूकार्यकर्ते सलीम-जावेद यांना हवे असलेले सर्व दोष देऊ शकतात परंतु जोपर्यंत ते यापेक्षा चांगले आणि अधिक आकर्षक पर्याय प्रदान करीत नाहीत…खूप वाईट… सतत तक्रारदाराचा कोणीही आदर करत नाही. ज्यादिवशी हिंदी सिनेसृष्टी बॉलिवूडमध्ये रूपांतर झाले त्या दिवसापासून एका विस्तारित संदर्भात तिची पडझड सुरू झाली. सलीम-जावेद आणि "अ‍ॅंग्री यंग मॅन" आणि "एन्टी-एस्टेब्लिशमेंट" चित्रपट युगाच्या समाप्तीनंतर एक शांततेचाकाळ होता. हिंदी सिनेसृष्टी श्रीमंत आणित्यांच्या वंशजांनी बॉलिवूडमध्ये बदलून टाकली. आज बॉलिवूडचा एकतर भारताशी किंवा वास्तवाशी संबंध नाही. यामुळे, गेल्या दशकात किंवा त्याहून अधिक काळ, तो कलात्मकपणे वांझ बनले आहे आणि त्याच्या यशासाठी विकृतीवर अवलंबून राहावे लागते . हीशून्यता कोण भरू शकते हे पाहणे बाकी आहे. चित्रपटाद्वारे वैचारिक गुण मिळविण्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला अधोगतीला पोहचवले आहे. भारतीय आणि शास्त्रीय सौंदर्यात्मकताच्या उत्कृष्ट परंपरेवर अवलंबून राहणे कदाचित मदत करेल.

उत्तर कथा

त्यानंतर जावेद अख्तरने आव आणणे सोडून दिले आहे आणि एक कट्टर हिंदूंचा शत्रू म्हणून उघडपणे वावरतांना दिसले. पत्नी, अति गणलेली शबाना आझमी यांच्याप्रमाणेच तेही राज्यसभेचे खासदार बनले आणि या जोडप्याने दिल्लीतल्या अति-महागड्या लोधी इस्टेट परिसरातील एका ऐषआरामाचे सरकारी बंगल्यावर राहायला लागले. त्यासाठी कुणीही त्यांच्यावर टीका करू नये परंतु त्यांचा खोटारडेपणा आणि कृतघ्न दावा फेटाळणे अगदी जरुरी आहे जेव्हा ते असा दावा करतात की त्यांना मुंबईत फ्लॅट मिळू शकले नाहीत कारण ते मुसलमान आहेत . द्वेषपूर्ण शबाना आझमी एवढे सुद्धा म्हणाली की भारतीय लोकशाही मुसलमानांवर अन्यायकारक आहे.

दरम्यान, जावेद अख्तर यांचे दुरावलेला लेखन भागीदार, सलीम खान आपल्या अक्षम्य कावेबाज मुलगा सलमान खानाच्या बाजूने राहून सुद्धा सभ्य राहिला आहे.

समाप्ती

The Dharma Dispatch is now available on Telegram! For original and insightful narratives on Indian Culture and History, subscribe to us on Telegram.

logo
The Dharma Dispatch
www.dharmadispatch.in